सूराबर्डीत आढळला अज्ञात युवकाचा मृतदेह - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०२ मे २०१९

सूराबर्डीत आढळला अज्ञात युवकाचा मृतदेह

हत्या की अपघात?

वाडी ( नागपूर ) / अरूण कराळे: 

वाडी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सूराबर्डी येथील सुधांशु महाराज आश्रमच्या ५०० मिटर अंतराच्या झाड-झूडपीत बुधवार १  मे रोजी युवकाचा मृतदेह आढळल्याने परीसरात एकच खळबळ उडाली आहे.पोलीसांच्या प्राप्त माहितीनुसार युवकाचे वय अंदाजे ३५ वर्ष आहे. युवकाने पांढऱ्या रंगाची शर्ट व तपकिरी रंगाची पेन्ट घातली होती .मृतदेह  जवळपास तीन दिवसापासून असून उन्हामुळे काळा पडला आहे .कान-नाकातून  रक्त निघाल्याने मृत्यदेहाला किड लागली आहे .

१ मे रोजी स्थानिक नागरीकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली होती.वाडी पोलीसांना माहिती मिळताच ११ वाजताच्या सूमारास पोलीस घटनास्थळी पहोचली होती.मृतदेहाची शहानिशा करता नेमके कारण समजले नाही.युवकाची हत्या की अपघात ? असा प्रश्न निर्माण झाला आहे .पुढील तपास वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेन्द्र पाठक यांच्या मार्गदर्शनात वाडी पोलीस करित आहे.