धक्कादायक:एक हजार दया अन टिसी न्या.. - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१३ मे २०१९

धक्कादायक:एक हजार दया अन टिसी न्या..

शाळेच्या मुख्याध्यापकांकडुन होतोय 
परस्पर टिसीची विक्री 
मूल/रमेश माहूरपवार:

एकीकडे इंग्रजी माध्यमांचा शाळेतील प्रवेशासाठी पालकांमध्ये चढाओढ सुरू आहे तर दुसरी कडे नौकरी वाचविण्यासाठी विदयार्थी पटसंख्या जुडविण्याची जिल्हा परिषदशिक्षकांची तसेच खाजगी अनुदानीत शाळेच्या शिक्षकांची धडपड सुरू आहे. विदयार्थी मिळविण्यासाठी आता शिक्षकांनी पालकांना,विदयाथ्र्यांना विवीध प्रलोभन देण्यासोबतच विदयार्थी पुर्वी शिकत असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापकांशी सुत जुळवुन विदयाथ्र्यांची टिसी परस्पर हस्तगत करण्याच्या गोरखधंदा चालविला आहे.

मुख्याध्यापकाकडुन परस्पर विदयाथ्र्याची टिसी नेणारा शिक्षक नंतर विदयाथ्र्याच्या पालकाशी संपर्क करून तुमचा पाल्याचे आमच्या शाळेत प्रवेश झाल्याचे सांगुन आम्ही विदयाथ्र्यांना गणवेश,बॅग,पुस्तक आणि ईतर अनुषंगीक साहित्य मोफत देण्याचे आश्वासन—प्रलोभन देउन विदयाथ्र्याचे शाळेतील प्रवेश निश्चीत करून घेत आहे. विदयाथ्र्यासाठी वाटटेल ते जिवाचे रान करणारे शिक्षक तालुक्यातील विवीध भागात दिसुन येत आहे. विदयार्थी पटसंख्या कमी झाल्यास अतिरीक्त ठरण्याच्या आणि त्यामुळे नको असलेल्या भागात स्थानांतरण होण्याच्या भितीने जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक विदयाथ्र्यांसाठी धडपडत आहे तर खाजगी अनुदानीत शाळेचे वर्ग वाचविण्यासाठी पर्यायाने आपली नौकरी सुरक्षित ठेवण्यासाठी त्या—त्या शाळेचा शिक्षक विदयाथ्र्याच्या शोध घेत आहे.

पुर्वी आपल्या पाल्याला शाळेत प्रवेश देण्यासाठी शिक्षकांना विनवणी करणारा पालक आता मालकाच्या भुमिकेत असुन विदयार्थी देण्याच्या मोबदला घेत आहे. जिल्हा परिषद आणि खाजगी अनुदानीत शाळेतील शिक्षकाची ही परीस्थिती असतांना इंग्रजी माध्यमांचा शाळांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी पालकांची चढाओढ दिसुन येते. शिक्षणासारख्या पवित्रक्षेत्रातील या बदललेल्या पण वास्तव परीस्थितीला शासनाचे वेतन घेणा—या शिक्षकांना सामोरे जावे लागत आहे.त्यामुळे शिक्षणक्षेत्रातील पावित्रयही भंग होउ लागले आहे.