मोबाईल,टॅब्लेटच्या माध्यमातून होईल आर्थिक जनगणना - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१६ मे २०१९

मोबाईल,टॅब्लेटच्या माध्यमातून होईल आर्थिक जनगणना

नागपूर/अरूण कराळे:

भारत सरकार केंद्रीय संख्यांची मंत्रालय अंतर्गत जून महिन्यात सुरू करण्यात येणारी सातवी आर्थिक जनगणना मोबाईल , टॅबलेट चा उपयोग करण्यात येईल अशी माहिती जिल्हा परिषद राष्ट्रसंत तुकडोजी सभागृहात सीएससी राज्य समन्वयक वैभव देशपांडे, विभागणीय समन्वयक निलेश कुंभारे , विनय पहलानी  यांनी दिली.

वैभव देशपांडे यांनी सांगितले की जून मध्ये सातवी आर्थिक जनगणना आहे .आपल्या मोबाईल , टॅबलेट द्वारे सुरु होत आहे. ब्लॉक मधील सर्व घरे मकान ,दुकान आणि लहान-मोठे दुकानदार जोडले जाणार आहेत. हे संपूर्ण कार्य पेपरलेस आहे . ही योजना सीएससी कॉमन सर्विस सेंटर द्वारा अंतर्गत सर्व सेंटर संचालकांनी इमानदारीने कार्य पार पाडावे कुठल्याही प्रकारची हयगय करता कामा नये.

सीएससी केंद्र चालक सुपरवायझर म्हणून काम पाहतील त्याअंतर्गत एनव्हीलेटर सर्वे करतील सुपरवायझर आणि एनव्हीलेटर यांना ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. यावेळी नागपूर सीएससी सहकारी सोसायटीचे अध्यक्ष नंदकिशोर रामटेके , वाडीचे रविंद्र खैरकर,महेंद्र शेंडे, जिल्हा समन्वयक प्रशांत झाडे , उमेश मानमोडे, कपिल वानखेडे , प्रमोद सरोदे, राहुल विखार , चेतन मुळे जिल्ह्यातील सीएससी केंद्र संचालक उपस्थित होते