चांपा गावातील पाणी टंचाईवर मात,मिळाली प्रशासनाची साथ - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१५ मे २०१९

चांपा गावातील पाणी टंचाईवर मात,मिळाली प्रशासनाची साथ

चांपा /प्रतिनिधी:

येथील शासकीय विहीरी कोरड्या पडल्या असून पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या भेडसावत होती .में महिना ग्रामस्थांसाठी फारच तापदायक ठरत आहे .येथील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याकरीता सार्वजनिक विहीर वगळता अन्य दुसरे साधन नाही .

चांपा हे गाव नागपुर उमरेड मार्गावर असल्यामुळे दिवसेंदिवस लोकसंख्येत वाढ होत आहे .वाढत्या जनतेची तहान योजना पूर्ण करू शकत नाही .त्यामुळे पाणीपुरवठा तीन दिवसाआड होतो .यातून नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. चांपा ग्रामपंचायतच्या शासकीय विहिरीच्या पातळी खालावल्याने भीषण पाणी टंचाईचा प्रश्न भेडसावत होता .सूरगावच्या शासकीय विहिरीने चांपा गावाची तहान भागवली , चांपा ग्रामपंचायत येथील सरपंच अतीश पवार यांनी उमरेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेंद्र जूवारे व सहाय्यक गटविकास अधिकारी जयसिंग जाधव यांच्याकड़े धाव घेत माहिती दिली .

चांपा ग्रामपंचायतवर भीषण पाणी टंचाईचे सावट असून सूरगाव ग्रामपंचायत कड़े शासकीय विहिरीमधून पाणी देण्याची मागणी केली असता सूरगाव येथील सरपंच विशाखा गायकवाड यांनी पिण्याचे पाण्याची समस्या जाणवताच चांपा गावाला पाणी देण्यास तत्काळ मंजुरी दिली . 

में च्या महिन्यात चांपा ग्रामपंचायतच्या शासकिय विहिरची पाण्याची पातळी खालावल्याने चांपा ग्रामपंचायतवर पाणी टंचाईचे सावट असून सूरगावातील शासकीय विहिरीतुन पाणी देण्याची मागणी  उमरेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेंद्र जूवारे व सहाय्यक गटविकास अधिकारी जयसिंग जाधव यांनी केली व तत्काळ चांपा गावाला भेट दिली .

चांपा गावात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाल्याने तत्काळ चांपा गावाची पिण्याचे पाण्याची समस्या सोडवण्याकरीता गटविकास अधिकाऱ्यांनी पुढाकार घेत  सूरगावचे सरपंच यांची समजूत घालुन चांपा गावाला दुष्काळ मुक्त करण्याकरिता पाणी देण्याची मागणी केली होती . गटविकास अधिकाऱ्यांच्या व सरपंच यांच्या प्रयत्नाने गावाचा पिण्याचे पाण्याचा प्रश्न सोडवला आहे .

सरपंच अतीश पवार यांनी गटविकास अधिकारी महेंद्र जूवारे व जयसिंग जाधव यांच्या पुढाकाराने गावाला पाणी मिळाल्याने पंचायत समिती उमरेडचे गटविकास अधिकाऱ्यांचे व सूरगाव येथील सरपंच विशाखा गायकवाड यांचे सर्व चांपा वासियांकडुन आभार व्यक्त केले .