कामगार दिनाचा आनंद उपभोगन्या पासून कामगार राहिले वंचीत - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०१ मे २०१९

कामगार दिनाचा आनंद उपभोगन्या पासून कामगार राहिले वंचीत

  रमेश माहूरपवार/मूल :

   1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन म्हणून सर्वत्र आनंद  साजरा केला जात असतांना मूल  नगर परिषदेचे कंत्राटी सफाई कामगारांना मात्र हा आनंद उपभोगन्यापासून वंचीत राहावे लागले.                                                             आज 1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. झेंडा वंदनानंतर महाराष्ट्र राज्याचा आणि कामगारांचा हितासाठी शासनाने कोण कोणते उल्लेखनीय कार्य केले या विषयी शासनकर्ते आणि शासकीय अधिकारी विवीध व्यासपीठावरून भाषणं देतात. त्या नंतर शासनाचे सर्व कर्मचारी शासकीय सुट्टीचा आनंद उपभोगता.  मात्र मूल शहरात आजच्या  कामगार दिनी वेगळेच चित्र बघायला मिळले. नगर परिषदेचे कंत्राटी सफाई कामगार शहरातील स्वच्छता अबाधित राखण्याचे कार्य करीत कामगार दिनाचा आनंद साजरा करीत होते. आजचा दिवशी सर्वच क्षेत्रातील कामगारांना सुट्टी दिली जात असते परंतु मूल नगर परिषदेचे कामगारांबाबतचे नियत वेगळे आहे. याच सफाई कामगारांचा कर्तुत्वाने मूल नगर परिषदेला स्वच्छता स्पर्धेत नामांकन मिळाले. मात्र पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी आपली वाहवाही करून घेतली. कामगार दिनाचा निमित्ताने सर्वच कर्मचारी सुट्टीचा आनंद उपभोगत असतांना येथील सफाई कामगार मात्र त्या पासून वंचीत राहिले.