नागपुरात बगीच्यातील सरकारी निधीतील खेळणे चोरट्यांनी केले लंपास - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०९ मे २०१९

नागपुरात बगीच्यातील सरकारी निधीतील खेळणे चोरट्यांनी केले लंपास

वाडी नगर परीषदेचे दुर्लक्ष 
वाडी ( नागपूर ) / अरूण कराळे :

चिमूकल्यांच्या खेळणासाठी वाडी नगर परिषद मार्फत वार्ड क्रंमांक २मधील  वसंत विहार येथील दुर्गा माता मंदिरच्या मैदानावर बगीच्या  तयार करण्यात आला  आहे .

 बगीच्याच्या आत विविध प्रकारचे खेळणी लावण्यात आली .वाडी नगर परीषदेतर्फे बगीच्याच्या सौंदर्यीकरण व खेळणीसाठी साडे पाच लाख रुपये खर्च करण्यात आले होते. बगीच्यातील मैदानावरुन ४० टक्के खेळणी साहित्य चोरट्यांनी लंपास केले.सरकारी मालमत्याची चोरी होवून सूद्धा वाडी नगर परिषदेचे  दुर्लक्ष असल्याचा अंदाज येत आहे.स्थानिक भर वस्तीमधुन चोरटे साखळी  सह खेळणी साहित्य गायब करु शकतात हा खूप गंभीर बाब असल्याने नागरीकांमध्ये भयभीतचे वातावरण निर्माण झाले

आहे.संबंधित ठिकाणीच नाही तर वाडीतील प्रत्येक गार्डन व ग्रीन जीमच्या साहीत्याची अत्यंत दैनावस्था झाली आहे. वाडी नगर परीषदमार्फत  प्रत्येक बगीच्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही तसेच गार्डनच्या गेट वर सरंक्षणासाठी व देखरेखीसाठी सिक्युरिटी  ठेवले पाहिजे अशी मागणी नागरिकांची आहे.