नागपुरात रिलायन्स कंपनीचे मोबाईल टॉवर सील - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०४ मे २०१९

नागपुरात रिलायन्स कंपनीचे मोबाईल टॉवर सील

धरमपेठ झोनची कारवाई : साडे तीन लाखांवर कर होता थकीत
नागपूर/प्रतिनिधी:
मालमत्ता कर थकविणाऱ्या दोन मोबाईल टॉवरवर धरमपेठ झोन अंतर्गत कारवाई करण्यात आली. टॉवर सील करून त्याचा विद्युत पुरवठा बंद करण्यात आला. 

धरमपेठ झोनअंतर्गत असलेल्या मौजा धरमपेठ वॉर्ड क्र. ७० येथील भास्कर चिमूरकर यांच्या मालमत्तेवर असलेल्या ए.टी.सी. मोबाईल टॉवरवर मागील दोन वर्षांपासून कर थकीत आहे तर सरीता को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी येथील गोमती अपार्टमेंटवर असलेल्या रिलायन्स इन्फोकॉम लि.च्या टॉवरवर चार वर्षांपासून कर थकीत आहे. दोन्ही टॉवरवर एकूण ३,७७,४५७ रुपयांचा कर थकीत आहे. त्यामुळे दोन्ही टॉवर सील करून त्यांचा विद्युत पुरवठा बंद करण्यात आला. सात दिवसांच्या आत कराचा भरणा न केल्यास दोन्ही टॉवरचे स्ट्रक्चर जप्त करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 

सदर कारवाई धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त महेश मोरोणे यांच्या नेतृत्वात कर निरीक्षक सर्वश्री हेमाणे, निमगडे, मौजे, ढवळे यांनी केली. धरमपेठ झोनतर्फे थकीत मालमत्ता कराच्या वसुलीसाठी दररोज वारंट कारवाई करण्यात येत असून मालमत्ता धारकांनी थकीत कराचा भरणा करण्याचे आवाहन झोनचे सहायक आयुक्त महेश मोरोणे यांनी केले आहे.