नाग नदी,पिवळी नदी,पोरा नदी नागपूरकर करणार स्वच्छ - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०४ मे २०१९

नाग नदी,पिवळी नदी,पोरा नदी नागपूरकर करणार स्वच्छ

मनपातर्फे रविवारपासून लोकसहभागातून नदी स्वच्छता अभियान

नागपूर/प्रतिनिधी:

नागपूर महानगरपालिकेच्या वतीने रविवारपासून (ता.५) मुख्य नद्यांच्या स्वच्छता अभियानाला सुरुवात होत आहे. नाग नदी, पिवळी नदी आणि पोरा नदी अशा तीन नद्यांचा यात समावेश असून लोकसहभागातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. 

मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार ५ मे पासून सुरू होणारे नदी स्वच्छता अभियान ५ जून पर्यंत चालणार आहे. संपूर्ण अभियानाचे समन्वयन आणि संनियंत्रणाची जबाबदारी मुख्य अभियंता उल्हास देबडवार यांच्याकडे सोपविण्यात आली असून अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्याकडे नाग नदी, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख यांच्याकडे पिवळी नदी तर उपायुक्त राजेश मोहिते यांच्याकडे पोरा नदी स्वच्छता अभियानाची जबाबदारी राहणार आहे. याव्यतिरिक्त अन्य अधिकाऱ्यांना विविध जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.

नागपूर शहरातील नद्यांच्या स्वच्छतेकरिता एकूण १० एक्झीक्युटिव्ह ग्रुप तयार करण्यात आले असन त्यात कार्यकारी अभियंता हे चमूप्रमुख असतील. या ग्रुपमध्ये सहायक आयुक्त तथा वॉर्ड अधिकारी, उपअभियंता, स्वास्थ झोनल अधिकारी व कनिष्ठ अभियंत्यांचा समावेश करण्यात आला आहे. 

पोरा नदी स्वच्छता अभियानाचा शुभारंभ रविवारी (ता. ५) सकाळी ७ वाजता सहकार नगर घाटाजवळ तर नाग नदी स्वच्छता अभियानाचा शुभारंभ सकाळी ८ वाजता संगम चाळ नाग नदी स्वच्छता अभियानाचा शुभारंभ तर सकाळी ९ वाजता नारा घाट येथे पिवळी नदी स्वच्छता अभियानाचा शुभारंभ होईल. या अभियानात यंत्रणेसोबतच लोकांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.