साळ्याने केली भाटव्याची हत्या - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०४ मे २०१९

साळ्याने केली भाटव्याची हत्या

ब्रह्मपुरी/प्रतिनिधी:
 तालुक्यातील कोलारी येथील शेतशिवारात साळ्यानेच आपल्या बहिण जावयाचा निर्घृण खून केल्याची घटना उघडकीस आली. मोतीराम पंढरी तलमले असे मृतकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.
हत्या साठी इमेज परिणाम
मृतक मोतीराम व पत्नी संगीता यांचे बऱ्याच दिवसांपासून आपसात पटत नव्हते. सुमारे दोन महिन्यांपूर्वी पत्नी संगीता ही मुलाबाळांसह मोशी येथील माहेरी निघून गेली. कदाचित या प्रकरणाचा सूड घेण्यासाठी मृतकाचा साळा संजय हिरामण राऊत व त्याचा साथीदार चंद्रशेखर धरीराम सहारे रा. मेंढा (भंडारा) यांनी संगनमत करून मोतिरामला ठार केल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

 डोक्यावर जखम व रक्ताने माखलेले केस अशा अवस्थेत मोतिरामचा मृतदेह दिसून आल्याने त्यांनी कोलारी गावचे पोलीस पाटील लेकचंद हुमणे यांना घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती होताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. डोक्यावर शस्त्राचा वार करून मृतकाला ठार केल्याचा कयास व्यक्त करण्यात येत आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी तायवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अश्विनकुमार खेडेकर, पोलीस उपनिरीक्षक सय्यद, अरुण पिसे, तानू रायपुरे, कृष्णराव राय, लालश्याम मेश्राम आदींनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला व पुढील कार्यवाही केली. त्यानंतर याप्रकरणी त्यांच्याविरोधात भादंवि कलम ३०२,३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.