महावितरण सूचना:बुधवारी नागपूरच्या या भागातील वीज पुरवठा राहणार बंद - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०७ मे २०१९

महावितरण सूचना:बुधवारी नागपूरच्या या भागातील वीज पुरवठा राहणार बंद

नागपूर/प्रतिनिधी:

अत्यावश्यक देखभाल आणि दुरुस्तीसाठी बुधवार दिनांक ८ मे रोजी स्नेह नगर, पांडे ले आऊट सह शहरातील काही नागरी भागात वीज पुरवठा बंद राहणार आहे. 

सकाळी ७ ते ११ या वेळेत पांडे ले आऊट, स्नेह नगर, खामला, मालवीय नगर,सीता नगर, गावंडे ले आऊट, वाडी, दत्तवाडी,सत्य साई नगर,गजानन नगर,शिवशक्ती नगर, वीणा नगर,आंबेडकर नगर, सकाळी ६ ते १० या वेळेत धरमपेठ पोलीस वसाहत, भोळे पेट्रोल पंप परिसर, पत्रकार कॉलनी, टांगा स्टॅन्ड, येथील वीज पुरवठा बंद राहील. सकाळी ८ ते ११ या वेळेत आठ रास्ता चौक परिसर, लक्ष्मी नगर,भेंडे ले आऊट, इंद्रप्रस्थ कॉलनी, राऊत वाडी, मनीष ले आऊट, पन्नासे ले आऊट, प्रज्ञा ले आऊट,प्रताप नगर, अग्ने ले आऊट, हुडकेश्वर, पिपला फाटा, गणेशधाम, नरसाळा, हुडकेश्वर खुर्द आणि बुद्रुक,अभ्यंकर नगर,श्रद्धानंद पेठ, कार्पोरेशन कॉलनी येथील वीज पुरवठा बंद राहील. सकाळी ७ ते १० या वेळेत अमरावती रोड येथील हिंदुस्थान कॉलनी, गोंड बस्ती, रामनगर येथील वीज पुरवठा बंद राहील. सकाळी ७ ते १०. ३० या वेळेत बेलतरोडी, पद्मावती नगर, रेवती नगर,जग्गनाथ सोसायटी, हरिहर नगर येथील वीज पुरवठा बंद राहील.
पोल्ट्रीफीड