अपघातग्रस्त परिवाराच्या मदतीला आमदार गिरीश व्यास गेले धावून - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०८ मे २०१९

अपघातग्रस्त परिवाराच्या मदतीला आमदार गिरीश व्यास गेले धावून

नागपूर/ललित लांजेवार: 

नागपूर विधानपरिषदेचे आमदार गिरीश व्यास यांनी मानवियतेचा परिचय दिला आहे.बुधवारी नागपूर मानेवाडा येथील रहिवासी हरीश पाटेकर,पत्नी कविता पाटेकर,अरुण जामड़े,पत्नी रतना जामड़े परिवार हे आपल्या व्यागनआर क्रमांक MH 49 B 1094 वाहने नागपूर वरून पुलगाव येथे लग्न समारंभासाठी जात होते.अचानक गाडीचे नियंत्रण सुटले व गाडी थेट १५ फुट खोलगट भागात ३ वेळ पलटी खाल्ली.यात त्यांना चांगलीच दुखापत झाली.

याच मार्गाने मागून नागपूरचे आमदार गिरोश जी व्यास, नरेश जुम्मानी, अनंत पात्रिकर राहुल गनवीर नांदेड येथे जात होते,वाटेत अपघात झाल्याचे निदर्शनात आल्याने त्यांनी आपली गाडी अपघात स्थळाकडे घेत खाली उतरून आपल्या साथीदार व गावकर्यांच्या मदतीने अपघात ग्रस्तांना मदत केली. 

तत्काळ आमदार व्यास यांनी आपल्या गाडीतून अपघातग्रस्त परिवाराला वर्धा येथील गांधी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले.व पाटेकर व जामड़े परिवाराच्या घरी अपघाताविषयी माहिती दिली .वेळेवर अपघात ग्रस्तांना मदत करत आमदाराने लोकप्रतिनिधी असल्याचे व आपल्यातल्या मानवतेचा परिचय दिला.