रस्तेबांधणीसाठीचे टँकर-मिक्सर-मशीन जाळले - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१३ मे २०१९

रस्तेबांधणीसाठीचे टँकर-मिक्सर-मशीन जाळले

kavyashilp Digital Media    फाईल फोटो                                  

 गडचिरोली - राज्याच्या दुर्गम भागात सुरू असलेल्या विकास कामांना नक्षलवाद्यांनी विरोध कायम ठेवला असून रस्ते बांधणीच्या कामासाठी आणलेली साधने पुन्हा एकदा जाळली आहेत. एटापल्ली तालुक्यातील बुर्गी पोलीस स्टेशन हद्दीतील ऐमलीवरून मंगूठा गावाकडे जाणाऱ्या मार्गावर जाळपोळ करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

पंतप्रधान ग्राम सडक योजना निर्माण कामावर टँकर, दोन सिमेंट कॉक्रेट मिक्सर मशीन, रोड रोलर व सेंट्रिंग वापराचे साहित्य आणण्यात आले होते. मात्र नक्षलवाद्यांकडून मध्यरात्रीच्या सुमारास ही वाहने जाळण्यात आली. यवतमाळच्या शाम बाबा कंट्रक्शन कंपनीचे अनिल सेवदा नामक ठेकेदारास काम देण्यात आले होते. जाळण्यात आलेली वाहने व साहित्य एटापल्ली नगरपंचायत उपाध्यक्ष रमेश गंपावार यांचे मालकीचे असल्याचे माहिती मिळते आहे. गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात नक्षलवाद्यांनी अशाच प्रकारे विकास कामांना विरोध करून परिसरात दहशत पसरवण्याचा प्रयत्न चालवला आहे.