पशुसंवर्धन विभागाच्या शिपायाने शेतकऱ्यांना घातला २२ लाखांचा गंडा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०७ मे २०१९

पशुसंवर्धन विभागाच्या शिपायाने शेतकऱ्यांना घातला २२ लाखांचा गंडा

वर्धा/प्रतिनिधी:
गंडा साठी इमेज परिणाम
पशुसंवर्धन विभागाच्या एका शिपायाने खोटी बतावणूक करून एक नव्हे २ नव्हे तर तब्बल १४ शेतकऱ्यांना २२ लाखांनी गंडा घातल्याचा प्रकार समोर आला होता.या प्रकरणी जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी ही चौकशी समिती गठीत केली.समितीचा अहवाल प्राप्त झाल्यावर दोषीवर फौजदारी कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

७५ टक्के अनुदानावर गाय, म्हशी देण्याची योजना सन २०१८-१९ पासून आॅनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. मात्र, निलंबीत शिपाई गुरनुले याने आष्टी तालुक्यातील १४ शेतकऱ्यांना तब्बल २२ लाखाचा गंडा घातला. याची दखल घेत शिवसेना आर्वी विधानसभा प्रमुख बाळा जगताप यांनी शेतकऱ्यांना घेवून आष्टी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

७५ टक्के अनुदानावर गाय, जनावरे देण्याची योजना सन २०१८-१९ पासून ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. मात्र, निलंबीत शिपाई गुरनुले याने १४ शेतकऱ्यांना चुकीची माहिती देत तब्बल २२ लाखाचा गंडा घातला. या प्रकरणाची दखल शिवसेना आर्वी विधानसभा प्रमुख बाळा जगताप यांनी घेवून आष्टी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणात आता चौकशी समिती तपास करीत असून समितीचा अहवाल प्राप्त होताच सदर शिपायाला बडतर्फ करीत त्याच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.
पोल्ट्रीफीड

मिळालेल्या माहितीनुसार निलंबीत शिपाई गुरनुले हा पशुवैद्यकीय दवाखाना पार्डी ता. कारंजा येथे कार्यरत होता.यावेळी देखील तेथे शेतकऱ्याला फसविले होते.याबाबद चौकशी करून त्याला तात्काळ निलंबन करून सेलू येथे पाठविण्यात आले होते.
(स्त्रोत:लोकमत)
पोल्ट्रीफीड