भारतीय पदवीपूर्व विद्यार्थ्‍यांसाठी 'एक्‍सलन्‍स अवॉर्डस्' सादर - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

११ मे २०१९

भारतीय पदवीपूर्व विद्यार्थ्‍यांसाठी 'एक्‍सलन्‍स अवॉर्डस्' सादरन्‍यूझीलंडने राखले 'एज्‍युकेटिंग फॉर द फ्यूचर इंडेक्‍स रँकिंग'मधील अव्‍वल स्‍थान

भारत, २०१९: एज्‍युकेशन न्‍यूझीलंडने भारतीय विद्यार्थ्‍यांसाठी पहिल्‍याच न्‍यूझीलंड एक्‍सलन्‍स अवॉर्डस् पदवीपूर्व स्‍कॉलरशिप्‍स पॅकेजची घोषणा केली. या प्रतिष्ठित अवॉर्डसमध्‍ये १८ स्‍कॉलरशिप्‍स ते न्‍यूझीलंडच्‍या कोणत्‍याही एका युनिव्‍हर्सिटीमध्‍ये शिक्षण घेण्‍याची सुविधा यांचा समावेश आहे. तसेच यामध्‍ये शैक्षणिक वर्षादरम्‍यान होणा-या खर्चांसाठी ८४ लाख रूपयांचा निधी देखील आहे.

या अवॉर्डसची रचना पदव्‍युत्‍तर न्‍यूझीलंड एक्‍सलन्‍स अवॉर्डस् योजनेला मिळालेल्‍या भव्‍य यशानंतर करण्‍यात आली आहे. पदव्‍युत्‍तर न्‍यूझीलंड एक्‍सलन्‍स अवॉर्ड्स योजनेने १०० भारतीय विद्यार्थ्‍यांना न्‍यूझीलंडमध्‍ये त्‍यांचे शिक्षण पूर्ण करण्‍याबरोबरच करिअरमधील स्‍वप्‍ने पूर्ण करण्‍यासाठी साह्य केले आहे.

भारतीय कुटुंबं विद्यार्थ्‍यांच्‍या भावी उज्‍ज्‍वल करिअरसाठी सर्वोत्‍तम पर्याय म्‍हणून न्‍यूझीलंडमधील शिक्षणाला अधिक प्राधान्‍य देत आहेत. २०१८ मध्‍ये न्‍यूझीलंड युनि‍व्‍हर्सिटीजमधील भारतीय विद्यार्थ्‍यांच्‍या नोंदणीमध्‍ये १७ टक्‍क्‍यांची वाढ दिसून आली आणि २०१९ मध्‍ये पहिल्‍यांदाच व्हिसा घेणा-या विद्यार्थ्‍यांच्‍या संख्‍येमध्‍ये ४३ टक्‍क्‍यांनी वाढ झाली.

इकॉनॉमिस्‍ट इंटेलिजन्‍स युनिटच्‍या (ईआययू) एज्‍युकेटिंग फॉर द फ्यूचर इंडेक्‍सने भावी कामासाठी विद्यार्थ्‍यांना सुसज्‍ज करण्‍याच्‍या न्‍यूझीलंडच्‍या क्षमतेला मान्‍यताकृत केले आहे. मार्चमध्‍ये ईआययू इंडेक्‍सने न्‍यूझीलंडला सलग दुस-या वर्षासाठी जगातील सर्वोत्‍तम इंग्लिश-स्‍पीकिंग शिक्षण संस्‍था म्‍हणून प्रमाणित केले. ईआययू इंडेक्‍स ३५ देशांना काम व जीवनाच्‍या बदलत्‍या गरजांची पूर्तता करण्‍यासाठी आवश्‍यक असलेल्‍या विद्यार्थ्‍यांना सक्षम करण्‍याच्‍या त्‍यांच्‍या क्षमतांच्‍या संदर्भात प्रमाणित करते.

न्‍यूझीलंडमध्‍ये विद्यार्थ्‍यांना एका अशा वातावरणामध्‍ये स्‍वत:साठी विचार करण्‍यासाठी प्रोत्‍साहित केले जाते, जेथे चौकसवृत्‍ती, जिज्ञासा व स्‍वतंत्र विचारांना सन्‍मानित केले जाते. न्‍यूझीलंड सरकारने नुकतेच पदवीपूर्व स्‍नातक व पदव्‍युत्‍तर शिक्षण घेणा-या विद्यार्थ्‍यांसाठी शिक्षणानंतर तीन वर्षांचा ओपन वर्क व्हिसा सादर केला. यूझीलंडच्‍या युनिव्‍हर्सिटीज आंतरराष्‍ट्रीय विद्यार्थ्‍यांसाठी इंटर्नशिप्‍स व ग्रॅज्‍युएट अॅडवायजरी सपोर्ट सेवा देतात.

भारत, आग्‍नेय आशिया व मध्‍यपूर्वसाठी प्रादेशिक संचालक श्री. जॉन लॅक्‍सन म्‍हणाले, ''न्‍यूझीलंड युनिव्‍हर्सिटीजची निवड करणा-या भारतीय विद्यार्थ्‍यांच्‍या संख्‍येमध्‍ये १७ टक्‍क्‍यांची वाढ दिसून आली आहे. आता अधिक व्‍यापक स्‍कॉलरशिप पॅकेजसह आम्‍ही पदवीपूर्व विद्यार्थ्‍यांना न्‍यूझीलंडमधील जागतिक दर्जाचे शिक्षण घेण्‍याची संधी देताना अधिक उत्‍सुक आहोत. आमच्‍या सर्व युनिव्‍हर्सिटीज जगातील अव्‍वल ३ टक्क्‍यांमधील युनिव्‍हर्सिटीजमध्‍ये आहेत. या सर्व युनिव्‍हर्सिटीज जागतिक स्‍तरावरील मान्‍यताकृत शिक्षण व करिअर संधी देतात.''

अर्ज करण्‍यासाठी https://www.studyinnewzealand.govt.nz/new-zealand-excellence-awards येथे लॉगइन करा.

न्‍यूझीलंडचा उपयोजित शिक्षण दृष्टिकोन आणि कामाचा वास्‍तविक अनुभव पदवीधरांना अभ्‍यासामधून कामाचा प्रत्‍यक्ष अनुभव मिळण्‍यामध्‍ये मदत करतात. अनेक पात्र विद्यार्थी 'वर्क-रेडी' म्‍हणजेच कामासाठी सक्षम असतात आणि कंपन्‍या अशाच विद्यार्थ्‍यांचा शोध घेत असतात. न्‍यूझीलंड सर्वाधिक चांगली कामगिरी करणा-या विद्यार्थ्‍यांसाठी ७व्‍या क्रमांकावर आहे (४० देशांपैकी). स्रोत: ओईसीडी प्रोग्राम फॉर द इंटरनॅशनल अस्‍सेसमेंट ऑफ अडल्‍ट कम्‍पीटन्‍सीज (पीआयएएसी).