६ वाजुन ४५ मिनिटानी दोन बहिणींना चिरडले - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१५ मे २०१९

६ वाजुन ४५ मिनिटानी दोन बहिणींना चिरडले
नागपूर: बुधवारी सकाळी ६ वाजुन ४५ मिनिटानी या दोन बहिणींना चिरडले. अपघात एवढा भीषण होता की, दोन्ही मुलींचा घटनास्थलीच मृत्यु झाला. लक्ष्मी शाहु वय २१ आणि आँचल शाहु वय १९ राहनार अम्बे नगर दुर्गा नगर अश्या मृत्यू झालेल्या बहिणींची नावे आहेत. पारडी बाजार चौकात झालेल्या अपघातामध्ये दोन सख्ख्या बहिणींनी जीव गमवला आहे

या सकाळी दूध घ्यायला जात होत्या. रस्ता लहान असल्यामुळे त्या टिप्परच्या चाकात अडकल्या आणि तिथेच त्यांचा करुण अंत झाला. घटनास्थळी मेट्रो आणि उडान पुलाचे काम अत्यंत संथ गतिने सुरु असून यामुळे रोज इथे लहान मोठे अपघात होत आहेत. गेल्या 48 तासात भंडारा रोड वर अपघाताचे ३ बळी गेले आहेत. यामुळे परिसरात रोष व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या घटनेला प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप स्थानिक शिवसेना नेत्यांनी केला आहे. प्रशासनाच्या विरोधात आज दुपारी ४ वाजता शिवसेनेकडून ढोल बजाओ आंदोलन करण्यात येणार आहे.