आजाराला कंटाळुन मजुरांची आत्महत्या - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

३० एप्रिल २०१९

आजाराला कंटाळुन मजुरांची आत्महत्या

चांपा/उमरेड:

आजारास कंटाळून श्याम प्यारेलाल नेताम  (वय 41)रा .गांधीनगर ता डोंगरगढ जि राजनांदगाव छत्तीसगढ़ हा परिवारासह उण्द्री सुरगाव येथे राहत होता .सध्या खासगी खदानीत मजूर म्हणून काम करत होता .उण्द्री या गावातील परिसरात श्याम प्यारेलाल नेताम  हे मागील दोन महिन्यापासून इसबगोल नावाच्या दीर्घ आजारांमुळे त्रस्त होते.रविवारी ता .28 ला सायंकाळी आठ वाजताच्या सुमारास पत्नीला मी गावातील चौकात जाऊन येतो असे म्हणून घरून निघून गेला .रात्री घरी न परतल्यावर दामिनी व मुलगा लक्की यांनी शोध घेत असतांना सोमवारी ता 29ला दुपारी दीड च्या सुमारास शोध घेत असताना उण्द्री तालावाजवळील चिंचेच्या  झाडाला रस्सीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निर्देशनास आले .याबाबत त्यांचा मुलगा लक्की नेताम वय (13) वर्ष  रा .उण्द्री  सुरगाव ता उमरेड सोबत आई दामिनी पतीचा शोध घेत असताना चिंचेच्या झाडाला आजाराला कंटाळून श्याम नेताम यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली या घटनेची नोंद कुही पोलिस  ठाण्याअंतर्गत येणाऱ्या पाचगाव  पोलिस चौकीत करण्यात आली .चिंचेच्या झाडाला लटकलेला अवस्थेत आढळले असे फिर्यादी म्रुतकची पत्नी दामिनी श्याम नेताम यांची तोंडी तक्रार दिली असता आकस्मिक म्रुत्युची नोंद घेण्यात आलीजा

आजारास कंटाळून श्याम प्यारेलाल नेताम  (वय 41) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची या घटनेची माहिती मिळताच  पाचगाव पोलिस चौकीचे प्रभारी पोलिस उपनिरीक्षक  प्रमोद राऊत सह  पोलिस शिपाई संजय कानडे.मेजर अशोक काटे .भोयर यांनी घटनास्थळी धाव घेतली असता झाडाला लटकलेल्या म्रुत अवस्थेत आत्महत्या केल्याचे आढळले. आकस्मिक म्रुत्युची नोंद कुही पोलिस ठाण्यात झाली आहे.असून पुढील तपास कुही पोलिस स्टेशनचे ठाणेदार परघणे करीत आहेत .