कला हा कलावंताचा एक अविभाज्य अवयव - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२९ एप्रिल २०१९

कला हा कलावंताचा एक अविभाज्य अवयव

  • गट शिक्षणाधिकारी सुभाष जाधव 
  • दवलामेटी (हेटी ) जि.प. शाळेत कला प्रदर्शनी

वाडी ( नागपूर ) / अरूण कराळे आमची शाळा कशी चांगली राहील याचा प्रत्येक शिक्षकाने विचार केला तर नक्कीच आपली शाळा चांगली होण्यास काहीच वेळ लागणार नाही .दवलामेटी (हेटी ) जि.प. शाळेची कला प्रदर्शनी अतिशय उत्कृष्ठ असून नागपूर पंचायत समीतीमध्ये अजून पर्यत अशी कला प्रदर्शनी बघीतली नाही .केंद्रातील सर्व शाळेतील शिक्षिकांनी ही प्रदर्शनी पाहण्याचे आवाहन केले . धैर्य पूर्ण करण्याचे व्यसन प्रत्येकाने लावले तर मराठी माध्यमाच्या शाळाही प्रगती पथावर राहील . प्रत्येक शाळेंनी हा उपक्रम राबविल्यास प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये कलेचा अविष्कार जागृत होतो .कला हा कलावंताचा एक अविभाज्य अवयव आहे . असे मार्गदर्शक नागपूर पं.सं. चे गट शिक्षणाधिकारी तथा सहाय्यक गट विकास अधिकारी सुभाष जाधव यांनी केले . दवलामेटी(हेटी ) जि.प. शाळेत बुधवार ८ मे रोजी पर्यत कला प्रदर्शनी आयोजित करण्यात आली . त्या निमीत्ताने गट शिक्षणाधिकारी तथा सहाय्यक गट विकास अधिकारी सुभाष जाधव यांच्या हस्ते कला प्रदर्शनीचे उदघाटन सोमवार २९ एप्रिल रोजी करण्यात आले . त्यावेळी ते बोलत होते . व्यासपीठावर शिक्षण विस्तार अधिकारी गोपाल कुनघटकर , गुलाब उमाठे, ग्रामविकास अधिकारी विष्णु पोटभरे, माजी सरपंच संजय कपनीचोर , केंद्रप्रमुख शरद भांडारकर , मुख्याध्यापीका प्रभा भिसे , वंदना जांभुळकर प्रामुख्याने उपस्थित होते . सर्वप्रथम दिपप्रज्वलीत करून सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यानी बनविलेली कला प्रदर्शनी पाहून चिमुकल्यांचे कौतूक केले . या प्रदर्शनीत वॉलपीस ,मातकाम , शिवणकाम , कातरकाम, विविध प्रकारचे ग्रीटींग , टाकावू वस्तूपासून टिकावू वस्तू , फोमच्या वस्तू , महापुरुषांचे पुतळे, श्रीगणेश तसेच देवीच्या मुर्त्या , प्लॉवर अशा विविध प्रकारच्या वस्तू विद्यार्थ्यांकडून तयार करून कला प्रदर्शनीत मांडल्या आहे . या सर्व वस्तूचे प्रदर्शन बुधवार ८ मे पर्यत राहणार आहे . प्रास्ताविक मुख्याध्यापिका उमा चौधरी , संचालन शिक्षीका व मार्गदर्शीका मनिषा चौधरी , आभार प्रदर्शन केंद्र मुख्याध्यापक भास्कर क्षीरसागर यांनी केले .शिक्षण विस्तार अधिकारी गोपाल कुनघटकर यांनी सांगीतले की केवळ पुस्तकी शिक्षण न देता विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी प्रत्येक शिक्षकांनी पुढाकार घ्यावा . शिक्षण विस्तार अधिकारी गुलाब उमाठे यांनी सांगीतले की मी वयाच्या दहाव्या वर्षापासून आगकाडीच्या कव्हरचा छंद जोपासला आहे .मी कलेची चोरी करीत आहो आणि सर्वांनी कलेची चोरी केलीच पाहीजे .
शिक्षणाबरोबरच मुलांनी छंद देखील जोपासला पाहीजे त्यांला जर चित्रकला,शिल्पकला, गाणं आणि नृत्य सारख्या गोष्टी करायच्या असतील तर त्यांला अडवू नका. असे मार्गदर्शन केले . ग्रामपंचायत तर्फे शाळेसाठी दहा लाख खर्च करून सरंक्षण भिंत बांधून दिली . त्यामुळे ही शाळा आता उत्तरोत्तर प्रगती करीत आहे .विद्यार्थ्यानी बनविलेले किल्ले परिसरात कौतुकाचा विषय ठरला होता अशी माहीती शिक्षिका मंजूषा चौधरी यांनी संचालनातून दिली . मुख्याध्यापीका उमा चौधरी यांनी प्रास्ताविकतेमधून सांगीतले की आम्हाला ही शाळा आमच्या स्वप्नातील शाळा बनवायची आहेत . पुढील वर्षीचे नियोजन याच वर्षी करुन विद्यार्थी वाढविण्यासाठी नवनवीन प्रयोग करणार आहोत .