पेट्रोलिंग करतांना पोलिसांच्या वाहनाचा अपघात - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

३० एप्रिल २०१९

पेट्रोलिंग करतांना पोलिसांच्या वाहनाचा अपघात

पत्रकाराची अपघातग्रस्त पोलिसांना मदत
ठाणेदारासह 3 पोलीस अपघातात गंभीर जखमी 
नागपूर/ललित लांजेवार:

पेट्रोलिंग करतांना पोलीस वाहनाचा अपघात झाल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास ब्रह्मपुरी येथील पॉलिटेक्निक कॉलेज जवळ घडली. ब्रम्हपुरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रमोद मकेश्वर हे तीन पोलीस सहकाऱ्या सोबत रात्रीची गस्त घालतांना पॉलिटेक्निक कॉलेज जवळ त्यांच्या वाहनाला धान कटाईच्या मशीनने ने धडक दिली त्यात ब्रह्मपुरी पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रमोद मकेश्वर व तीन पोलीस सहकारी गंभीर रित्या जखमी झाले.


धडक इतकी जोरदार होती कि पोलीस वाहनाचा पुढील भाग चकणाचूर झाला, जखमींत ब्रम्हपुरीचे ठाणेदार प्रमोद मकेश्वर यांचे सह विठोबा गजभिये, पुंडलिक परचाके ,वाहन चालक नाजूकराव चहांदे हे सर्व रोडवर जखमी अवस्थेत होते. याच दरम्यान नागभिड वरून ब्रह्मपुरीकडे येत असताना पत्रकार प्रशांत डांगे व त्यांच्या पत्नी प्रा.सरोज डांगे यांनी आपली गाडी थांबवून ब्रह्मपुरी पोलिस स्टेशनला फोन करून एक खाजगी वाहन थांबवून ठाणेदार प्रमोद मकेश्वर व अन्य दोन सहकाऱ्यांना दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले,तत्काळ पोलीस स्टेशनचे पोलीस त्याठिकाणी दाखल होत जखमींना ब्रह्मपुरी ख्रिस्तानंद दवाखान्यात भरती करण्यात आले.सर्व अपघातग्रस्त किरकोळ जखमी असल्याचे कळते. पत्रकार प्रशांत डांगे यांनी दिलेल्या माणुसकीच्या परिचयाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.