Marathon मँरेथाँन स्पर्धा 5 फेब्रुवारीला - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

Marathon मँरेथाँन स्पर्धा 5 फेब्रुवारीला

जुन्नर /आनंद कांबळे 

जुन्नर एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक गुरुवर्य रा.पृ सबनीस यांच्या १२५व्या जयंतीनिमित्ताने येत्या ५ फेब्रुवारी भव्य मँरेथाँन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती संस्थेचे कार्याध्यक्ष राहुल जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या पत्रकार परिषदेस संस्थेचे अध्यक्ष संभाजी बुट्टे पाटील, माजी सेक्रेटरी अँड.सुधीर ढोबळे ,माजी विद्यार्थी संघाचे राजेंद्र जुंदरे ,आनंद सासवडे उपस्थित होते.

गुरुवर्य रा.प सबनीस यांच्या जयंतीनिमित्ताने  मंगळवारी ( ता.५) सकाळी ७.१५ वाजता मँरेथाँन स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेचे उद् घाटन विघ्नहर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर,यांच्या हस्ते होणार आहे.यावेळी माजी विद्यार्थी डाँ.दिलीप बांबळे, पोलिस निरिक्षक यशवंत नलावडे उपस्थित राहणार आहेत. 

त्याचप्रमाणे जुन्नर शहरातून शोभायात्रेचे आयोजन केले असून यामध्ये जुन्नर एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाखेतील विद्यार्थी ,माजी विद्यार्थी , व नागरिक  तसेच आमदार शरददादा सोनवणे ,नगराध्यक्ष शाम पांडे सामील होत आहेत असेही राहुल जोशी यांनी सांगितले .

वर्षभर विविध कार्यक्रम होणार आहेत.

दुपारी पारितोषिक वितरण होत असून यावेळी सत्यशील शेरकर,अनिलतात्या मेहेर , अप्पासाहेब बुट्टे  पाटील उपस्थित राहणार आहेत.

गुरुवर्य रा.प सबनीस यांनी जुन्नर तालुक्यात केलेल्या भरीव शैक्षणिक कामामुळेच तालुक्याची शैक्षणिक प्रगती झाली आहे.