जुनोना येथे जलमहलस्वच्छता अभियान - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

जुनोना येथे जलमहलस्वच्छता अभियान

जुनोना :अमोल जगताप

येथे ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत, संयुक्त वन व्यवस्थापन समिती च्या माध्यमातून अध्यक्ष श्री. मेघश्याम पेटकुले यांच्या मार्गदर्शनाखाली मागील 2 दिवसापासून जलमहाल जुनोना व सभोवतालच्या परिसराची स्वच्छता करण्यात आली,ह्या उपक्रमात इको प्रो जुनोना चे सदस्य प्रशांत मांढरे, आरुष भोयर, किशोर पेटकुले, महेंद्र कार्लेकर यांचे सहकार्य लाभले तसेच ह्या उपक्रमात ग्रामपंचायत जुनोना ,सावित्रीबाई फुले विद्यालय जुनोना चे विद्यार्थी आणि शिक्षक व इतर कर्मचारी यांच सहभाग लाभला विद्यार्थ्यांना स्वच्छतेच महत्त्व कळावं आणि ग्रामस्थांना स्वच्छतेची आवड निर्माण व्हावी आणि गोंडकालीन महालाचे जतन कश्या प्रकारे करावा ह्या साठी हा उपक्रम राबविण्यात आला या प्रसंगी समितीचे उपाध्यक्ष श्री अमोल जगताप, उपसरपंच श्री. रवीजी गेडाम, समिती सदस्या श्रीमती सविता वेलादी, सौ. प्रेमीला शेंडे व  गावकरी मोठ्या संखेने उपस्थित होते ..