वन विकास महामंडळ कर्मचाऱ्यांचे द्वितीय अधिवेशन मोठ्या थाटात संपन्न - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

वन विकास महामंडळ कर्मचाऱ्यांचे द्वितीय अधिवेशन मोठ्या थाटात संपन्न

चंद्रपुर/अमोल जगताप:

  शनिवारला प्रियदर्शनी सभागृह चंद्रपुर येथे महाराष्ट्र राज्य वन विकास महामंडळ कर्मचारी संघटनेचे द्वितीय राज्यस्तरीय अधिवेशन थाटात संपन्न झाले. अधिवेशन चा शुभारंभ आदरणीय बाबुजी यांच्या शुभ हस्ते दिप प्रज्वलन करून झाला.प्रसंगी महाराष्ट्र राज्य वन विकास महामंडळ कर्मचारी संघटन च्या वतीने बाबुजी यांचे भव्य सत्कार करण्यात आला.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष यांनी प्रस्तावनेत आजपर्यंतच्या काळात मा.श्री चंदनसिंह चंदेलजी सारखे अध्यक्ष कधी महामंडळला लाभले नाही. बाबुजी यांच्या नेत्रुतवात कर्मचारी वर्ग मोठ्या आनंदात एक नवीन जोमात आपले कर्तव्य संपुर्ण निष्ठेने पार पाडत आहे.या वेळी संघटनेच्या वतीने त्यांचे प्रश्न व मागण्या बाबुजी यांच्या समोर मांडल्या.या अधिवेशन ला संबोधित करतांना आदरणीय बाबुजी यांनी सांगितले कि अनेक प्रलंबित मागण्या व प्रश्न मार्गी लागले असुन उर्वरित प्रश्न लवकर सुटतील असे आश्वासन दिले. 

कधी नव्हे असे निर्णय या कार्यकाळात घेण्यात आले.यातुन कर्मचारी हित लक्षात घेऊन प्रत्येक पाऊल वर मी तुमच्यासोबत आहे असा ठाम विश्वास यावेळी बाबुजी यांनी समस्त कर्मचारी वर्गाला दिला. या प्रसंगी मंचावर श्री ऋषिकेश रंजन महाव्यवस्थापक उत्तर चांदा वन प्रकल्प, श्री जी.के.अनारसे महाव्यवस्थापक दक्षिण चांदा वन प्रकल्प,श्री नवकिशोर रेड्डी विभागीय व्यवस्थापक मार्कण्डा विभाग,श्री बी.बी.पाटिल कार्याध्यक्ष कर्मचारी संघटना,श्री हरीश शर्मा नगराध्यक्ष न.प.बल्लारपुर तथा जिल्हाध्यक्ष भाजपा चंद्रपुर(ग्रा),श्री प्रभु दावड़ा सेवानिवृत्त विभागीय व्यवस्थापक, श्री सुधाकर डोळे सेवानिवृत्त महाव्यवस्थापक, श्री एम.ए.ठाकुर संयोजक सत्कार समिती, श्री सारंग बोथे वपअ ,श्री आर.आर.बारटक्के वपअ,श्री बोबडे उपाध्यक्ष कर्मचारी संघटना,श्री अशोक तुंगीडवार सरचिटणीस कर्मचारी संघटना,श्री शिवचंद द्विवेदी जिल्हासंयोजक स्वच्छ भारत अभियान चंद्रपुर,श्री काशीनाथ सिंह भाजपा अध्यक्ष बल्लारपुर शहर,श्री सतविंदरसिंग डारी जिल्हाध्यक्ष ट्रांसपोर्ट आघाडी चंद्रपुर,श्री निलेश खरबडे भाजपा नेता,श्री मनीष पांडे महामंत्री बल्लारपुर शहर,श्री अरुण वाघमारे नगरसेवक बल्लारपुर व अन्य संघटना मान्यवर उपस्थित होते.