वन विभागाने वाचविले निलगाईचे प्राण - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

वन विभागाने वाचविले निलगाईचे प्राण
उमेश तिवारी/कारंजा(घाडगे) वर्धा:

कारंजा येथील वनविभागाने विहिरीत पडलेल्या पाच वर्षाच्या निलगाईला जीवदान दिले. रघुनाथ नाचरे यांच्या शेतात 5 वर्षाची नीलगाय शेतातील विहिरीत पडली. विहिरीतून पडलेल्या नीलगाईचा आवाज येत असल्यामुळे ठोंबरे हे वीर जवळ गेले असता त्यांना विहिरीत पाण्यावर निलगाय असल्याचे दिसले. शेजारी शेतकरी ठोंबरे यांना दिसले त्याने तात्काळ रघुनाथ महादेव नासरे यांना फोन करून या घटनेची माहिती दिली. त्यानंतर लगेचच या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. लगेचच वनविभागाचा चमू सकाळी नऊ वाजता शेतात घटनास्थळी दाखल झाला व बचावकार्य सुरुवात झाले
एका तासाच्या परिश्रमाने नीलगाय बाहेर काढण्यात वनविभागाला यश आले. ही नीलगाय रात्री विहरित पडली असावी असा अंदाज व्यक्त केला.या नंतर निलगाईला जगलात सोडण्यात आले. पी. पी. कडसाईत, रामू उईके, पी.जि. खवसी, आकाश भलावी, गुलाब देवासे, दिनेश गिरी, हिंगवे आणि शिवारातील शेतकऱ्यांच्या मदतीने निलगाईला वाचवण्यात आले.  काही दिवसांपूर्वी वाघोडा गावालगत  शिवभूयार लागून असलेल्या भिंतीच्या बोळी मध्ये कुत्र्याच्या टोळीने निलगाईला अटकवून ठेवले होते. भविष्यात पाणी पिण्याच्या शोधात जगली प्राण्यांची अश्या घटना नाकारतात येत नाही.