Top News

मुख्यमंत्र्यांनी केली महाराष्ट्र भूषण पुरस्काराची घोषणा Maharashtra Bhushan 2022

ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी ( Appasaheb Dharmadhikari ) यांना महाराष्ट्र भूषण ( Maharashtra Bhushan )  पुरस्कार जा...

ads

रविवार, जानेवारी १५, २०२३

‘नायलाॅन’ मांजाचा वापर टाळा | Kite makarsankrat

पक्षी आणि मनुष्यप्राण्यांच्या सुरक्षेसाठी नायलाॅन मांजावर बंदी आणण्याची गरज - बंडु धोतरे




नायलाॅन धागा अत्यंत मजबुत असल्याने हे सर्व प्रकार होतात. पतंगत्सोवमुळे असंख्य पक्षी दरवर्षी मृत्युमुखी पडत असतात. जिकडे-तिकडे या धाग्यांचे जाळे झाडावर व तारांवर लटकलेले असतात. याबाबत सर्वच नागरीकांनी जागृतपणे या नायलाॅन मांजाचा वापर टाळणे तसेच आपल्या मुलांना या मांजा वापरापासुन परावृत्त करणे तसेच सर्वच शाळकरी विदयाथ्र्यामध्ये सुध्दा शिक्षकांनी याबाबत जागृती करणे गरजेचे आहे. सर्व बाल-गोपाल व चंद्रपूरकरांनी पतंगोत्सवाकरिता चायनिज-नायलाॅन मांजाचा वापर न करण्याचे आवाहन इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष तथा मानद वन्यजीव रक्षक बंडु धोतरे यांनी केले आहे.  Kite makarsankrat

Khabarbat मांजाचा धागा गळ्याला अडकून अकरा वर्षीय मुलाचा मृत्यू | Kite makarsankrat  


मकर सक्रांत आली की लहानापासुन मोठयापर्यत सर्वच हौशीने पतंग उडवीत असतात. या पतंग उत्सवात सर्वच सहभागी होऊन आंनद लुटत असतात. पतंग उत्सव आनंदाचा भाग मानला तरी या उत्सवासाठी वापरला जाणारा मांजा पक्षी व इतर सजिवांसाठी जिवघेणा ठरत असेल तर अशा आंनदाचा काय उपयोग?

पुर्वी सर्व प्रकारचे मांजे तयार केले जात असत, त्याकरिता वेग-वेगळे धागे यायचे. परंतु, अलिकडे मांजा तयार करून पतंगोत्सव साजरा करतांना कुणीच दिसत नाही. पतंग बाजारात रेडीमेड तयार मांजाने आपले पाय मोठया प्रमाणात पसरले आहे. आधी रेडीमेड मध्ये ‘बरेली’ मांजाच येत असे परंतु, आता सर्वत्र चायनिज नायलाॅन मांजाची धुम आहे. या नायलाॅन मांजामुळे झाडावर, तारांवर मांजा तुटल्यानंतर तसाच राहुन जातो यात पक्षी फसतात आणि मरतात. कित्येकदा वाहनस्वार रस्त्यांने धागा न दिसल्याने सुध्दा गंभीर दुखापत तसेच प्रसंगी मृत्यु सुध्दा झालेला आहे. विदयुत तारेवरची पतंग काढतांना सुध्दा जिव गमवावे लागलेले आहे.  Kite makarsankrat

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.