Top News

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अल्पसंख्यांक समाजातील युवक युवतींसाठी अल्पमुदतीचे अभ्यासक्रम

    चंद्रपूर (प्रतिनिधी)-     शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर येथे अल्पसंख्यांक समाजातील शिख, ख्रिश्चन, जैन, मुस्लिम, नवबौद्ध युव...

ads

शनिवार, जानेवारी २८, २०२३

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अल्पसंख्यांक समाजातील युवक युवतींसाठी अल्पमुदतीचे अभ्यासक्रम

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अल्पसंख्यांक समाजातील युवक युवतींसाठी अल्पमुदतीचे अभ्यासक्रम

 

  चंद्रपूर (प्रतिनिधी)- 
   शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर येथे अल्पसंख्यांक समाजातील शिख, ख्रिश्चन, जैन, मुस्लिम, नवबौद्ध युवक युवतीसाठी स्किल सेंटर योजनेअंतर्गत अल्प मुदतीचे अभ्यासक्रम सुरू करण्यात येत असून त्याकरिता इच्छुकांकडून प्रवेश अर्ज स्विकारण्यात येत आहे. सदर अभ्यासक्रम ४ महिने कालावधीचे असून प्रत्येक व्यवसायात उपलब्ध जागा ३० आहे. सीएनसी ऑपरेटर वर्टीकल मशीनिंग सेंटर , ड्राफ्ट्रसमन मेकॅनिकल, वेल्डिंग टेक्निशियन लेव्हल ३, आय.टी. कोआर्डीनेटर इन स्कूल, इलेक्ट्रिशन डोमेस्टिक सोल्युशन, आयर्न अँड स्टील मशीनिस्ट असे सहा महत्त्वाचे अभ्यासक्रम आहे.
    या अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी किमान दहावी पास असणे गरजेचे आहे. दहावीची मार्कशीट,टीसी,मायनारिटी सर्टिफिकेट, डोमिसिएल सर्टिफिकेट, आधार कार्ड या कागदपत्रांच्या झेरॉक्स आणि दोन पासपोर्ट फोटो लावून प्रवेश अर्ज भरता येईल. अल्पसंख्यांक समाजातील उमेदवार न मिळाल्यास सर्वसाधारण उमेदवारांचा प्रवेशासाठी विचार करण्यात येईल. इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे प्राचार्य रवींद्र मेहेंदळे यांनी केले आहे.
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त विविध स्पर्धा आणि डॉ. कल्याणकुमार यांचे व्याख्यान

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त विविध स्पर्धा आणि डॉ. कल्याणकुमार यांचे व्याख्यानचंद्रपूर (प्रतिनिधी)-
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आणि निवडणूक साक्षरता मंडळाचे सहकार्याने राष्ट्रीय मतदार दिनाचे आयोजन करण्यात आले होते. National Voter's Day 

नवमतदारांना जागृत करण्याच्या दृष्टीने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय मतदार दिवसाचे महत्त्व या विषयावरील घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेत ९ प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यात प्रथम पुरस्कार भाग्यश्री वैद्य , द्वितीय पुरस्कार कु. मयुरी पाझारे तर तृतीय पुरस्कार साहिल सोनटक्के यांना देण्यात आला. 

मतदार जागृती काळाची गरज या विषयावर घेण्यात आलेल्या वकृत्व स्पर्धेत सात प्रशिक्षणार्थांनी भाग घेतला.यात प्रथम पुरस्कार कु. छाया गायकवाड, द्वितीय पुरस्कार संदेश बेसेकर, तृतीय पुरस्कार जाकिर शेख यांना देण्यात आला. 

मतदान - राष्ट्रीय कर्तव्य या विषयावर घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत एकूण ३२ प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यात प्रथम पुरस्कार बालचंद्र कांबळे, द्वितीय पुरस्कार रितिकेश पाटील, तृतीय पुरस्कार संदेश झाडे यांना देण्यात आला. समारोपीय कार्यक्रमात राज्यघटना आणि मतदारांची कर्तव्ये या विषयावर एड. डॉ. कल्याण कुमार (Lecture by Kalyan Kumar) 
यांचे अभ्यासपूर्ण व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य रवींद्र मेहेंदळे होते. प्रास्ताविक सहाय्यक कार्यक्रम अधिकारी बी. आर. बोढेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन कार्यक्रम अधिकारी एन.एन. गेडकर यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी गटनिदेशक श्री. शेंडे , सौ. झाडे, सौ. गभणे , निदेशक श्री. घटे, रणदिवे, नाडमवार, रोडे , मार्तिवार, सौ. हेलवडे,कु. डुंबेरे, कु. साखरकर, गोर्लेवार , कु. वाघाडे, कु. माकोडे आदींनी सहकार्य केले.
उत्कृष्ट अधिकारी म्हणून संजय हजारे यांचा सत्कार

उत्कृष्ट अधिकारी म्हणून संजय हजारे यांचा सत्कार

**

*सहकारी पणन महासंघाच्या आढावा बैठकीत सत्कार*ब्रम्हपुरी: महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाच्या मुंबई येथे झालेल्या 64 व्या आढावा बैठकीत चंद्रपूर जिल्हा मार्केटिंग अधिकारी संजय वामनराव हजारे यांचा सन 2021-22 मधिल कार्यालयीन कामात उत्कृष्ठ काम केल्या बद्दल,उत्कृष्ठ अधिकारी म्हणुन महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाच्या वतिने राज्याचे सहकार मंत्री डॉ. अतुल सावे व सुधाकर तेलंग (भा.प्र.से.) व्यवस्थापकिय संचालक यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.Sanjay Hazare 

महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाच्या कामकाजासंदर्भात नुकतीच सुधाकर तेलंग (भा.प्र.से.) व्यवस्थापकिय संचालक यांच्या अध्यक्षतेखाली 2021 22 या आर्थिक वर्षाची अधिमंडळाची६४ वी आढावा बैठक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान जगन्नाथ भोसले मार्ग मंत्रालयासमोर नरिमन पॉईंट मुंबई येथे पार पडली. यावेळी राज्याचे सहकार मंत्री डॉ. अतुल सावे, माजी राज्यमंत्री सतीश पाटील, पणन महासंघाचे माजी उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, आबासाहेब काळे, पणन विभागाचे सहसचिव सुग्रीव धपाटे, पणन माजी संचालक मोहन अंधारे, भागवत धस, सर व्यवस्थापक डॉ. अतुल नेरकर, नागपूर जिल्हा पणन अधिकारी राजेश तराळे, सहकारी संस्थांचे पदाधिकारी पणन महासंघातील अधिकारी कर्मचारी  उपस्थित होते.
 सभासद, सहकारी संस्थाचे बळकटीकरण, शेतकऱ्यांना रास्त दराने कृषी निविष्ठांचा पुरवठा करणे, नाफेड व भारतीय खाद्य महामंडळाच्यावतीने राज्यात खरेदीचे कामकाज करणे, शेतमाल व कृषी निविष्ठा साठवणुकीसाठी गोदाम उपलब्ध करणे, विविध योजना राबविण्यासंदर्भात आढावा बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या संस्थांचा, विक्रमी कडधान्य खरेदी करणाऱ्या खरेदी व्रिकी सहकारी संघांचा, खत विक्री करणाऱ्या संस्थांचा तसेच उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यात चन्द्रपूर जिल्हा मार्केटिंग अधिकारी संजय  हजारे यांच्या सन 2021-22 मधिल कार्यालयीन कामकाजाची दखल घेत महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाने संजय हजारे यांना उत्कृष्ठ अधिकारी म्हणून स्मृतिचिन्ह , प्रशस्तीपत्र श्रीफळ देऊन सत्कार केला . जिल्हा मार्केटिंग अधिकारी संजय हजारे यांच्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Sanjay Hazare chandrapur Maharashtra India 
पंचशील प्राथमिक शाळा पिंपळगाव कोहळी येथे वार्षिकोत्सव उत्साहात साजरा"

पंचशील प्राथमिक शाळा पिंपळगाव कोहळी येथे वार्षिकोत्सव उत्साहात साजरा"
संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.२७ जानेवारी:-
रमेश शिक्षण संस्था कुडेगाव द्वारा संचालीत पंचशील प्राथमिक शाळा पिंपळगाव कोहळी ता-लाखांदूर जि-भंडारा येथे दिनांक-२३ ते २५  जानेवारी २०२३ दरम्यान आयोजन करण्यात आले होते. २३ जानेवारी २०२३ ला दुपारी १२ वाजता वार्षिकोत्सवाचा उद्घाटन सोहळा पार पडला.याप्रसंगी उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. नरेशजी मेश्राम सचिव र.शि.स. कु., उद्घाटक  म्हणून मा.नितीनजी पुगलिया इंडोफॉर्म ट्रॅक्टर अँड इक्विपमेंट नवेगाव बांध,स्वागताध्यक्ष  सुनीलभाऊ कापगते उपाध्यक्ष शा. व्य. समिती, तसेच प्रमुख अतिथी म्हणून सौ अस्मिताताई लांडगे सरपंचा पिंपळगाव,सौ गीताताई परशुरामकर उपसरपंचा पिंपळगाव, मा मनोजजी बन्सोड,मा संजयजी बन्सोड,मा सुरजजी चचाने,मा देवेन्द्रजी झोडे,मा संजयजी परशुरामकर,मा हिरालाल गजभिये,मा मोतीरामजी कुंभरे,सौ केवणाबाई परशुरामकर, सौ प्रज्ञाताई मेश्राम,मा राजेशजी नाकाडे,मा धनराजजी डोंगरवार, मा उज्वलजी नाकाडे,मा भालचंद्र चुटे मुख्या.,शाळेचे माजी शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सत्कारमूर्ती मा काशीरामजी कापगते,मा व्यंकटजी कुंभरे, मा कैलासजी परतेके,मा शालीकजी धोटे उपस्थित होते.सदर उद्घाटन सोहळ्यात चारही सत्कारमूर्तींचा शाल श्रीफळ देऊन प्रमुख अतिथीच्या हस्ते सत्कार केला गेला.सदर कार्यक्रमाला समस्त विद्यार्थी, बहुसंख्य पालक आणि गावकरी उपस्थित होते.
 यानंतर प्रमुख अतिथींनी उपस्थित विद्यार्थी, पालक आणि गावकरी मंडळींना मार्गदर्शन केले.यानंतर सायंकाळी ६ वाजेपासून विद्यार्थ्यांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले.२४ जानेवारी २०२३ ला दुपारी विद्यार्थ्यांच्या विविध शारीरिक आणि बौद्धिक स्पर्धा पार पडल्या.तसेच सायंकाळी ६ वाजेपासून विद्यार्थ्यांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले.२५ जानेवारी २०२३ ला सकाळी ११ वाजता महिला मेळावा तसेच महिलांना मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केला होता यात मा. सविताताई उपरीकर सरपंचा सानगडी, सौ अस्मिताताई लांडगे सरपंचा पिंपळगाव,सौ गीताताई परशुरामकर उपसरपंचा पिंपळगाव यांनी माता पालकांना मार्गदर्शन केले आणि दुपारी २ वाजता बक्षीस वितरण सोहळा पार पडला.त्यानंतर विद्यार्थी आणि पालकांना स्नेहभोजन दिले गेले.सदर वार्षिकोत्सवात मुख्याध्यापक भालचंद्र चुटे यांचा शाळा व्यवस्थापन समिती मार्फत सत्कार केला गेला. तसेच शाळेतील उपक्रमशील शिक्षक खुशाल डोंगरवार यांचा ग्रामपंचायत आणि गावकरी यांनी त्यांच्या कार्याबद्दल शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री खुशाल डोंगरवार सर ,प्रास्ताविक श्री भालचंद्र चुटे सर आणि आभार प्रदर्शन सुनीलजी  कापगते यांनी यांनी केले.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री किशोर शहारे, कु.अनुराधा रंगारी,कु.शिल्पा मेश्राम तसेच शाळा व्यवस्थापन समिती आणि माता पालक संघाचे  श्री दुर्गेश कुडेगावे, श्री कृष्णाजी कोराम, श्री राहुलजी जनबंधु, श्री विनोदजी शहारे, श्री संजयजी बन्सोड,श्री  विनोद शहारे,सौ आशा परशुरामकर, सौ सरोज परशुरामकर, सौ वंदना जोशी, सौ प्रियंका परशुरामकर,सौ रिता परतेके,सौ मिनाक्षी गजभिये, सौ हेमलता परशुरामकर, सौ मनीषा परशुरामकर, सौ मोतिका परशुरामकर,सौ रजनी जनबंधु, सौ दुर्गा परशुरामकर,  तुळशीराम बागडे, श्री रमेश शहारे,श्री प्रमोद परशुरामकर सौ चंपाबाई बागडे,सौ शेवंताबाई शहारे,समस्त पालक आणि मतापालक तसेच सर्व शालेय मंत्रिमंडळ आणि विद्यार्थी यांनी अथक प्रयत्न केले. अशाप्रकारे वार्षिकोत्सवाचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला गेला.

शुक्रवार, जानेवारी २७, २०२३

भाजपचे ज्येष्ठ नेते रघुनाथ लांजेवार यांचे निधन.उद्या अंतिम संस्कार.

भाजपचे ज्येष्ठ नेते रघुनाथ लांजेवार यांचे निधन.उद्या अंतिम संस्कार.
संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.२७ जानेवारी:-
येथील भारतिय जनता पक्षाचे जेष्ठ नेते, जिल्हा संपर्क प्रमुख, भाजपाचे जेष्ठ मार्गदर्शक अर्जुनी मोर. तालुका भाजपा चे माजी अध्यक्ष, नवेगांवबांध ग्रामपंचायत चे माजी सरपंच, उपसरपंच, खरेदी विक्री समिती अर्जुनी मोर. चे संचालक, एक मनमिळाऊ व निस्वार्थ जनतेची अहोरात्र सेवा करनारे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते, नवेगांवबांध निवासी रघुनाथ हगरुजी लांजेवार यांचे आज दि.27 जानेवारी रोज शुक्रवार ला दुपारी  2:30 वाजता भंडारा येथील खाजगी रुग्णालयात निधन झाले. मृत्युसमयी ते 72 वर्षाचे होते. उद्या दि.28 जानेवारी रोज शनिवार ला सकाळी 10.00 वाजता नवेगांवबांध येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांचे मृत्युपश्च्यात पत्नी, दोन मुले, दोन मुली व बराच मोठा परिवार आहे. 
भाजपाचे जेष्ठ नेते रघुनाथ लांजेवार यांचे निधनाने अर्जुनी मोर. विधानसभा क्षेत्रांतील भारतिय जनता पक्षाची प्रचंड हाणी झाली असुन,पक्षाने एक तळमळीचा व निष्ठावावान नेता गमावल्याची प्रतिक्रिया माजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केली आहे.
Breaking News : खोल पाण्यात गेल्यामुळे तिन मित्रांचा बुडून मृत्यू

Breaking News : खोल पाण्यात गेल्यामुळे तिन मित्रांचा बुडून मृत्यू


Breaking News : खोल पाण्यात गेल्यामुळे  तिन मित्रांचा बुडून मृत्यू
मृतदेह शोधताना.

चंद्रपूर chandrapur : कोरपना तालुक्यात येणाऱ्या अल्ट्राटेक कंपनी वसाहतीतील शाळेत शिकणारी अंदाजे १० वर्षाची तीन मुल सायंकाळपर्यंत घरी परतली नव्हती. आज 27 जानेवारी रोजी त्यांचे मृतदेह सापडले.


जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील अल्ट्राटेक परिसरातील पोहायला गेलेले तीन मुलं बेपत्ता झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. घटनास्थळावर पोलिसांना मुलांचे कपडे व इतर साहित्य सापडले. मुलांचा शोध घेणे सुरू होते. रात्र उशिरा पर्यंत शोध मोहीम राबविण्यात आली.अंधार झाल्याने बचाव पथकाला अडचण येत होती. रात्री त्यामुळ शोध थांबविण्यात आली. आज पहाटे पासूनच शोध मोहीम सुरू करण्यात आली. सकाळी दहा वाजता दरम्यान मृतदेह सापडले. हे तिन्ही मुलं दहा वर्षाची आहेत आणि एकच वर्गात शिकत असल्याची माहिती आहे. यातील एकजण अधिकाऱ्याचा मुलगा आहे. 
Chandrapur Crime News

 मुल डबक्याच्या पाण्यात पोहण्यासाठी गेली होती. खोल पाण्यात गेल्यामुळे ती बुडाली असा अंदाज घेऊन कंपनी व्यवस्थापन व गडचांदूर पोलिसांनी शोध घेतला. या घटनेने सर्वत्र शोककळा पसरली आहे. 

Police chandrapur Maharashtra India 
नागपूर : माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षेत प्रथम आलेल्या विद्यार्थिनिंचा झाला सत्कार!

नागपूर : माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षेत प्रथम आलेल्या विद्यार्थिनिंचा झाला सत्कार!
नागपूर : माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षेत प्रथम आलेल्या विद्यार्थिनिंचा झाला सत्कार!*
---------------------------------------------------
     विद्यार्थी विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय धामणा येथील विद्यार्थीनी कु.रविना तुळशिराम बेहेरे माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षा वर्ग १० मार्च २०२२ ला प्रथम क्रमांकाने पास तर कु.दिक्षा राजेश हनवते उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षा वर्ग १२ मार्च २०२२ ला प्रथम क्रमांकाने पास झालेल्या विद्यार्थिनिंना सामाजिक कार्यकर्ते संजय खांडेकर  यांनी गुरूवार दि. २६ जानेवारी २०२३  रोजी विद्यार्थी विकास विद्यालय व कनिष्ठ  महाविद्यालयात राष्ट्रीय कार्यक्रमादर्म्यान भारतीय राज्यघटना संविधान ग्रंथ पारितोषिक म्हणून दिले.      ह्यावेळी मंचावर माजी मुख्याध्यापिका सौ भोयर मॅडम,आजी मुख्याध्यापक श्री पुंजाराम राऊत, कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक श्री.मोहन नागमोते, नागपूर पंचायत समितीचे उपसभापती अविनाशजी पारधी, शिक्षिका विमलताई बेहेरे,पाहूने म्हणून उपस्थित प्रशांत गोमकार इत्यादी उपस्थित होते. मुख्याध्यापक श्री पुंजाराम राऊत सरांनी दोन्ही विद्यार्थिनिंना स्म्रुतीचिन्ह दिले व मुलींचा सत्कार केला.         ह्यावेळी दोन्ही विद्यार्थिनींनी विद्यालयातील सर्व कर्मचारी वर्गाचे आभार मानले व भविष्यात आम्ही शिक्षणात प्रगती करून आपल्या विद्यालयाचे नावलौकिक करू असे प्रतिपादन केले.

Nagpur Maharashtra India education news

गुरुवार, जानेवारी २६, २०२३

पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते सन्मानित

पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते सन्मानितपुणे दि. 26: पुणे जिल्ह्याने निवडणूक प्रक्रियेत उत्कृष्ट कल्पनांचा अवलंब केल्याबद्दल राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना 'बेस्ट इलेक्टोरल प्रॅक्टिसेस अवार्ड' या राष्ट्रीय पातळीवरील पुरस्काराने आज सन्मानित करण्यात आले.

Pune Collector Dr. Rajesh Deshmukh honored by President Draupadi Murmu

दिल्ली छावणी परिसरातील मानेकशॉ सभागृहात भारत निवडणूक आयोगाच्या वतीने १३ व्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु, केंद्रीय विधी व न्याय मंत्री किरेन रिजीजू, केंद्रीय विधी व न्याय राज्यमंत्री प्रा. एस. पी. बघेल, मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त अनूप चंद्र पांडे उपस्थित होते.  यावेळी देशातील विविध भागांमध्ये निवडणूक मतदान प्रक्रियेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राज्यांना, जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

भारत निवडणूक आयोगाचा या वर्षाची संकल्पना  'मतदानाइतके अमूल्य नसे काही, बजावू हमखास मताधिकार आम्ही', अशी आहे. यावेळी  प्रख्यात निर्देशक सुभाष घई द्वारा निर्मित 'मैं भारत हॅुं' या गाण्याचे सादरीकरण करण्यात आले.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर डॉ. राजेश देशमुख यांनी पुरस्कार मिळाल्याचा आनंद व्यक्त केला. दिल्ली येथील महाराष्ट्र परिचय केंद्राशी संवाद साधताना ते म्हणाले, आजचा महत्वाचा दिवस आहे. तेरावा राष्ट्रीय मतदार दिवस आज आपण या ठिकाणी साजरा केला आणि सर्व देशामध्ये दहा लाख पेक्षा जास्त ठिकाणी आज आपण साजरा करत आहोत, मी आजच्या मतदार दिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्रामधील आणि विशेष करून पुणे जिल्ह्यामधील ८० लाख मतदारांना शुभेच्छा देतो, त्यांचा अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे भारत निवडणूक आयोगाचे आम्ही आभार मानतो. पुणे जिल्ह्यामधील आमच्या सर्व टीमने गेल्या दोन वर्षांमध्ये मतदार यादी आणि निवडणुकांच्या संदर्भात घेतलेल्या परिश्रमाची फलश्रुती आज मिळाली आणि आज आमच्या सगळ्या टीमला माझ्या माध्यमातून हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे.

 गेल्या दोन वर्षांमध्ये भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादीचे शुद्धीकरण  करण्यासाठी आणि त्यातील त्रूटी दूर करण्यासाठी परिश्रम घेतले आहे. यामध्ये जवळपास सात लाखापेक्षा जास्त जे निवासी मतदार आहेत त्यावर काम केले. त्याचप्रमाणे मतदार यादी सर्वसमावेशक करण्यासाठी  निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष करून महिला मतदार, तृतीयपंथी मतदारांसाठी विशेष मोहीम राबविण्यात आली, विशेष शिबिरांचेही आयोजन करण्यात आले.  १७ वर्षे पूर्ण झाल्यानंतर मतदारांची नोंदणी करण्यासाठी २५ नोव्हेंबर आणि ५ डिसेंबर या दोन दिवशी ४४२ महाविद्यालयात महाशिबिरांचे आयोजन करून मतदार नोंदणी करण्यात आली. यातून ४८ हजारावर युवकांची मतदार नोंदणी करण्यात आली, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

पुणे जिल्ह्यात युवकांचा मतदार नोंदणीतील सहभाग वाढविणे, महिलांची मतदार नोंदणी याकडे त्यांनी विशेष लक्ष देण्यात आले. वंचित घटकांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचे उद्दिष्ट ठेवताना तृतीयपंथी मतदार, दिव्यांग मतदार, देह विक्री व्यवसायातील महिला यांच्या मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली. मतदार नोंदणीसाठी महाविद्यालयांमध्ये आयोजित शिबिरांनाही युवकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्यासह संयुक्त विद्यमाने शाळा व महाविद्यालयांमध्ये निवडणूक साक्षरता मंडळाच्या बळकटीकरणाचा कार्यक्रम घेण्यात आला.

जिल्हाधिकारी यांनी तृतीयपंथी मतदार नोंदणीसाठी तसेच दिव्यांग मतदारांसाठी घेतलेल्या पुढाकाराचा निवडणूक आयोगाने विशेष गौरव केला आहे. औद्योगिक क्षेत्रातील मतदार नोंदणीसाठी विशेष पुढाकार जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीतील सुमारे अडीच हजार मोठे व लहान उद्योगांपर्यंत पोहोचून मतदार नोंदणी करण्यात आली. उद्योगांच्या ठिकाणी समन्वयक अधिकारी नेमून तसेच उद्योगांमध्ये मतदार जागृती संघ स्थापन करून मतदार नोंदणीसाठी प्रयत्न करण्यात आले. 

जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांना यापूर्वीदेखील जिल्ह्यात पीएम किसान योजनेतील चांगल्या कामगिरीसाठी पुरस्काराने गौरविण्यात आले होते. तर सातारा येथे मुख्य कार्यकारी अधिकारी असतांना पीएम आवास योजना आणि स्वच्छ भारत अभियानातील चांगल्या कामगिरीसाठी पुरस्कार मिळाला होता.

 यावेळी ‘इलेक्टिंग द फर्स्ट सिटिजन- एन इलेस्ट्रेटेड क्रॅानिकल ऑफ इंडियाज प्रेसिडेंशियल इलेक्शन’ पुस्तकाची पहिली प्रत राष्ट्रपती यांना भेट स्वरूपात देण्यात आली.  राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते एकूण १३ राष्ट्रीय पुरस्कार वितरित करण्यात आले. 
0000
चंद्रपूर जिल्हा हा सामर्थ्य आणि पराक्रमाचे प्रतीक व्हावे    – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार sudhir mungantiwar

चंद्रपूर जिल्हा हा सामर्थ्य आणि पराक्रमाचे प्रतीक व्हावे – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार sudhir mungantiwar

पोलिस मुख्यालयात मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम
चंद्रपूर, दि. 26 : जगातील 193 देशांपैकी 14 देशांमध्ये वाघ आहेत. त्यापैकी सर्वाधिक वाघ भारतात असून देशात चंद्रपूर जिल्हा हा वाघांच्या संख्येत क्रमांक एक वर आहे. एकप्रकारे जगातील सर्वाधिक वाघ असलेला आपला जिल्हा आहे. वाघ हा सामर्थ्याचे प्रतीक मानला जातो. त्यामुळेच काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत चंद्रपूर जिल्हा हा सामर्थ्य आणि पराक्रमाचे प्रतीक व्हावे, अशी अपेक्षा राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

पोलिस मुख्यालय येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण केल्यानंतर जनतेला प्रजासत्ताक दिनाचा संदेश देतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेसी, मनपा आयुक्त विपीन पालीवाल आदी उपस्थित होते.
सुरवातीला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, सर्व धर्म आणि सर्व पंथांचा सन्मान करणारा हा आपला राष्ट्रीय उत्सव आहे. तसेच चांगल्या भावनेने काम करण्याचा हा संकल्प दिवस आहे. नाभीच्या देठापासून ‘जय हिंद’ किंवा भारत ‘माता की जय’ म्हटले तर आपली 50 टक्के देशभक्ती दिसून येते. मात्र 100 टक्के देशभक्ती सिध्द करायची असेल तर आपली कर्तव्य तत्परता कृतीतून दाखवावी लागेल. गत 75 वर्षात आपण संविधानातील आपले मुलभूत अधिकार बघितले. त्याबद्दल केवळ चर्चा केली. मात्र या संविधानाची तोपर्यंत पूर्ण फलश्रृती पूर्ण होणार नाही, जोपर्यंत आपण आपल्या कर्तव्याबद्दल चर्चा करणार नाही.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवापासून तर शताब्दी महोत्सवापर्यंत स्वत:ला कर्तव्यासाठी अर्पण करा. भयमुक्त, भुकमुक्त, विषमतामुक्त, प्रदुषणमुक्त, रोजगारयुक्त समाज आपल्याला घडवायचा आहे. समता, ममता, बंधुता हे शब्द ओठांपुरते मर्यादीत झाले आहेत. दिलेले कर्तव्य मी पूर्ण करेन, असा संकल्प करा. विद्यार्थ्यांनो खुप मोठे व्हा, अभ्यास करा, हाच या तिरंग्याला खरा ‘सॅलूट’ आहे. हा ध्वज केवळ कापडाचा एक तुकडा नाही तर आपल्या सर्वांसाठी तो प्राणप्रिय आहे. स्वातंत्र्यासाठी हजारो हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. या बलिदानाला सैदव आठवणीत ठेवा, असे आवाहनही त्यांनी उपस्थितांना केले.

*पालकमंत्र्यांच्या हस्ते उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार*:

ध्वजदिन निधी संकलनात सन-2021 मध्ये जिल्हयाने दिलेल्या उद्दिष्टानुसार 41 लक्ष 45 हजार (104 टक्के) इतका निधी संकलित केल्याबद्दल सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे तर्फे जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
सोबतच हवालदार नरेंद्र रामाजी वाघमारे ताम्रपट प्राप्त सैनिकांचा जिल्हा प्रशासनामार्फत सत्कार करण्यात आला. पोलिस विभागात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल उत्कृष्ट अन्वेषण अधिकारी म्हणून पोलिस उपाधीक्षक (गृह) राधिका फडके, ब्रह्मपुरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी मिलिंद शिंदे, पोलिस उपनिरीक्षक बाजीराव झाडे, गुणवत्तापूर्वक सेवा व पोलिस पदकासाठी निवड झाल्याबद्दल रामनगर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत लांबट, सायबर गुन्हे जनजागृतीकरीता सायबर पोलिस स्टेशनचे मुजावर युसुफ अली तर 2 ते 13 जानेवारी 2023 दरम्यान पुणे येथे आयोजित मिनी ऑलिम्पिक व महाराष्ट्र राज्य पोलिस क्रीडा स्पर्धामध्ये वुशू खेळ प्रकारात गोल्ड मेडल मिळाल्याबद्दल महिला नायक पोलिस शिपाई प्रिती बोरकर यांचा सत्कार पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आला.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत सन 2019-20, 2020-21 व 2021-22 या वर्षात क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल गुणवंत खेळाडूंना प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह व रोख रु. 10 हजार देऊन गौरविण्यात आले.
स्वातंत्र्य संग्राम सैनिक स्व.बाबूराव बनकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिवाकर बनकर यांनी योग सादर केलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक दिले.

जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयामार्फत पोंभुर्णाचे वैद्यकीय अधीक्षक तथा तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संदेश मामीडवार, प्राथमिक आरोग्य केंद्र तळोधीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार मंडल, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयामार्फत सुंदर माझे कार्यालय अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये प्राविण्य प्राप्त पंचायत समिती, चंद्रपूर प्रथम क्रमांक व पंचायत समिती पोंभुर्णा द्वितीय क्रमांक यांना पुरस्कार वितरण करण्यात आले. वीरपत्नी व वीरमाता, वीरपिता, तसेच शौर्यचक्र प्राप्त सुभेदार शंकर मेंगरे यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरवातीला पालकमंत्र्याच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर त्यांनी पोलिस परेडचे निरीक्षण केले. यावेळी पोलिस, होमगार्ड, नक्षल विरोधी पथक, स्काऊट-गाईड, एनसीसी, तसेच इतर विद्यार्थ्यांनी देखील पथसंचलन केले.
०००००००
 डॉक्टरने दिले महिला रुग्णांना "आरोग्याचे वाण"  occasion of Makar Sankranti Armori

डॉक्टरने दिले महिला रुग्णांना "आरोग्याचे वाण" occasion of Makar Sankranti Armori


मकरसंक्रातीनिमित्त पार पडला आगळावेगळा हळदी कुंकू

बालिका दिनानिमित्त रुग्णालयात जन्मलेल्या बाळांची संक्रातीनिमित्त लूट

स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. शिलू चिमुरकर यांनी केले निरोगी आरोग्यावर मार्गदर्शन

अनुसया मॅटर्निटी सर्जिकल अँड नर्सिंग होमचा उपक्रमगडचिरोली (दिनांक २६ जानेवारी) : Makar Sankrantiमकरसंक्रांती म्हटली की,‎ महिलांचा जिव्हाळ्याचा विषय‎ येतो. संक्रांतीनिमित्त महिला‎ आपल्या घरी हळदी कुंकू कार्यक्रम‎ ठेवत वाण म्हणून एकमेकींना‎ भेटवस्तू देतात. या पारंपारिक पद्धतीमध्ये‎ थोडा बदल करत अनुसया मॅटर्निटी सर्जिकल अँड नर्सिंग होमने आगळावेगळा उपक्रम आयोजित केला. रुग्णालयात आजवर उपचारासाठी आलेल्या महिला, विविध आजारासाठी शस्रक्रिया झालेल्या रुग्नांना एकत्रित आणत स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. शिलू चिमुरकर (Dr. Sheelu Chumurkar) यांनी "आरोग्याचे वाण" वाटले. विशेष म्हणजे वाण म्हणून एखादी भेटवस्तू न देता व्हिटॅमिन, कॅल्शिअम आणि निरोगी आरोग्यासाठी आवश्यक गोळ्या आणि औषधी वितरित केली.
स्त्रियांमध्ये आणि समाजामध्ये स्वतःच्या आरोग्याबद्दल कमालीची अनास्था असल्यामुळे आजार बळावतो. महिलांना त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी, यावर मार्गदर्शन करण्यासाठी मकरसंक्रांतीनिमित्त आरमोरी येथील अनुसया मॅटर्निटी सर्जिकल अँड नर्सिंग होममध्ये २५ जानेवारी रोजी "आरोग्याचे वाण" या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्त्या वसुधा कोपुलवार, शकुंतला गंटावार, सेवानिवृत्त शिक्षिका चव्हाण, बघमारे यांची उपस्थिती होती. Makar Sankranti

यावेळी डॉ. शिलू चिमुरकर यांनी सर्व महिलांना आरोग्यासाठी तीळ-गुळाचे महत्व, दैनंदिन जीवनात घ्यावयाची काळजी आणि निरोगी आरोग्यावर मार्गदर्शन केले. यावेळी उपचारासाठी आलेल्या महिला, प्रसूती झालेल्या स्तनदा माता आणि विविध आजारावर शस्रक्रिया झालेल्या महिला रुग्नांना व्हिटॅमिन, कॅल्शिअम गोळ्या आरोग्याचं वाण म्हणून देण्यात आले. बालिका दिनाचे औचित्य साधून रुग्णालयात जन्मलेल्या दोन बाळांची संक्रातीनिमित्त लूट करण्यात आली.
आरमोरी येथील वडसा मार्गावर असलेल्या अनुसया मॅटर्निटी सर्जिकल अँड नर्सिंग होमची मागील ४ महिन्याआधी सुरवात झाली. प्रारंभीपासून सामाजिक सेवेचे व्रत घेऊन आरोग्यसेवा दिली जात आहे. या भागात आरोग्याची अत्याधुनिक सुविधा नव्हती. त्यामुळे इथल्या रुग्णांना दूरच्या मोठ्या शहरात जावे लागायचे. मात्र, अनुसया मॅटर्निटी सर्जिकल अँड नर्सिंग होमची स्थापना झाल्यापासून इथल्या रुग्णांची गैरसोय दूर झाली आहे. तेव्हापासून आरमोरी, वडसा, कुरखेडा, कोरची या नक्षलग्रस्त भागातील रुग्ण येथे उपचारासाठी येऊ लागलीत. स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. शिलू चिमुरकर यांनी अवघ्या ४ महिन्यात आतापर्यंत ११ यशस्वी शस्त्रक्रिया केल्या. यातील ८ शस्त्रक्रिया या गर्भाशयाशी निगडित होत्या. महिलांना अनेक कारणांमुळे गर्भपिशवी साफ करावी लागते. अशा जोखमीच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे हाताळून महिलांना जीवनदान देण्याचे काम डॉ. शिलू चिमुरकर यांनी केले. महिलांना अंगावर पांढरे जाणे, मासिक पाळीच्या तारखा चुकणे, खाज सुटणे, संबंधानंतर लाल जाणे आदी समस्यांचे निराकरण त्यांनी केले.  
Makar Sankrantiबुधवार, जानेवारी २५, २०२३

विविध प्रश्नांना घेऊन किसान सभेचे तहसीलदारांना निवेदन Kisan Sabha's statement to Tehsildar regarding various issues

विविध प्रश्नांना घेऊन किसान सभेचे तहसीलदारांना निवेदन Kisan Sabha's statement to Tehsildar regarding various issues
जुन्नर,/आनंद कांबळे
: शेतकरी प्रश्नांवर दिनांक २५ जानेवारी २०२३ रोजी देशव्यापी होत असलेल्या आंदोलनाला पाठिंबा आणि स्थानिक प्रश्न घेऊन अखिल भारतीय किसान सभेच्या जुन्नर तालुका समितीच्या वतीने नायब तहसीलदार मुंढे यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी बोलताना किसान सभेचे तालुका सचिव लक्ष्मण जोशी म्हणाले, सबंध देशभरात शेतीचे भयानक संकट निर्माण झालेले आहे. शेतकरी आत्महत्या व शेतकऱ्यांची गळचेपी ही आपण रोज अनुभवत आहोत. या पार्श्वभूमीवर देशभरातील शेकडो शेतकरी संघटना एकत्रि त येत, संयुक्त किसान मोर्चा हे देशपातळीवरील एक मजबूत शेतकरी संघटन निर्माण झालेले आहे. या देशपातळीवर शेतकऱ्यांच्या हक्कासाठी निर्माण झालेल्या, संयुक्त किसान मोर्चाने पुन्हा एकदा देशव्यापी शेतकरी आंदोलनाची हाक दिली आहे.

संयुक्त किसान मोर्चाने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्रात वरील देशव्यापी प्रश्नांच्या सोबत राज्यातील ओला दुष्काळ, पीक विमा, गायरान व देवस्थान जमिनी, वनाधिकार, अपूर्ण कर्जमुक्ती यासारखे प्रश्न सोडवण्यासाठी आज राज्यभर तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चे, निदर्शने, ट्रॅक्टर मार्च आयोजित करण्यात आले होते, असेही जोशी म्हणाले.

निवेदनाद्वारे जुन्नर तालुक्यात मनरेगा अंतर्गत गाई गोठे शेतकऱ्यांनी बांधले आहेत त्याची थक्कीत बिले अदा करावीत, मनरेगा कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, गोद्रे उतळे वाडी पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण यंत्र बसवावे आदी मागण्या करण्यात आल्या.
यावेळी किसान सभेच्या अध्यक्षा माधुरी कोरडे, उपाध्यक्ष मुकूंद घोडे, कार्याध्यक्ष कोंडीभाऊ बांबाळे, खजिनदार नारायण वायाळ, दादाभाऊ साबळे, दीपक लाडके, प्रियांका उतळे, मंगल रढे, किसन घोडे, रुपाली रेंगडे, सोनाली सुरकुले, दीपाली उतळे, सुनीता आढारी, लता लोखंडे, कमल उतळे, गंगुबाई उतळे ,सुनीता उतळे आदींसह उपस्थित होते.